16

Polity

घटनादुरूस्ती

1 / 69

Category: घटनादुरूस्ती

1. पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ) 52 व्या घटनादुरुस्तीने मतदानाचे वय 21 वरून 18 वर आणले गेले.
ब) 61 व्या घटनादुरुस्तीने संसद व राज्य विधान मंडळाच्या सदस्यांचा दलबदलूपणा बेकायदेशीर ठरवीला गेला.
(राज्यसेवा मुख्य 2015)

2 / 69

Category: घटनादुरूस्ती

2. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?
(संयुक्त गट- क 2018)

3 / 69

Category: घटनादुरूस्ती

3. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) 61 व्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरुन 18 करण्यात आले आहे.
ब) 73 व्या घटनादुरुस्तीने पंचायतमध्ये महिलांकरिता 30% आरक्षण दिले गेले.
(Forest मुख्य 2015)

4 / 69

Category: घटनादुरूस्ती

4. कोणत्या घटनादुरुस्ती अन्वये 6 ते 14 वयोगटातील बालकांसाठी मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण हा मूलभूत हक्क मानला आहे ?
(ASO पूर्व 2011)

5 / 69

Category: घटनादुरूस्ती

5. जेव्हा राज्ये घटनादुरुस्ती विधेयकावर मंजूरी अथवा नामंजूरीची मोहोर लावतात, तेव्हा प्रत्यक्षात पुढीलपैकी कोण तो निर्णय घेत असते ?
(ASO Mains 2022)

6 / 69

Category: घटनादुरूस्ती

6. भारतीय संविधान (पहिली सुधारणा) कायदा 1950 कशासाठी आहे.
अ) भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर नवीन निर्बंध.
ब) व्यापार, धंदे किंवा सेवा यावर अर्हतेचे निकष.
क) लोकसभेतील प्रतिनिधित्व पुर्ननिर्धारित केले गेले.
ड) राज्यांकरिता केंद्रीय अधिनियमावर त्यांचे मत कळविण्यासाठी कालावधी निर्धारित केला गेला.
(राज्यसेवा मुख्य 2013)

7 / 69

Category: घटनादुरूस्ती

7. अनुच्छेद 368 नुसार संसद किती पद्धतीने संविधानात दुरुस्ती करू शकते ?
(ESI Mains 2022)

8 / 69

Category: घटनादुरूस्ती

8. खालीलपैकी कोणत्या अनुसूचीचा समावेश भारतीय राज्यघटनेत पहिली घटनादुरुस्ती करून करण्यात आला आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

9 / 69

Category: घटनादुरूस्ती

9. खालीलपैकी कुठल्या बाबींसंदर्भात घटनादुरुस्ती करावयाची असल्यास निम्म्यापेक्षा जास्त घटकराज्यांच्या विधिमंडळांची मान्यता आवश्यक असते ?
अ) राज्यघटनेतील कलम 54
ब) सातव्या परिशिष्टातील कोणताही विषय
क) संसदेमधील राज्यांचे प्रतिनिधित्व
ड) नागरिकत्व - प्रदान अथवा रद्द करणे.
वरीलपैकी कोणते वाक्य बरोबर आहे/आहेत ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

10 / 69

Category: घटनादुरूस्ती

10. कोणत्या संविधान संशोधन अधिनियमानुसार संसद एखाद्या राज्यामध्ये एका वर्षापेक्षा अधिक काळासाठी राष्ट्रपती शासन सुरु ठेवू शकतो ?
(Tax Asst. मुख्य 2018)

11 / 69

Category: घटनादुरूस्ती

11. खालील जोड्या लावा.
सूची-अ
घटनादुरुस्ती
अ) 69 वी घटनादुरुस्ती
ब) 75 वी घटनादुरुस्ती
क) 80 वी घटनादुरुस्ती
ड) 83 वी घटनादुरुस्ती
सूची-ब
तपशील
1) राज्यस्तरीय भाडे न्यायासन स्थापना.
2) अरुणाचल प्रदेशातील पंचायतीमध्ये अनुसूचितजातीच्या आरक्षणाची गरज नाही.
3) दहाव्या वित्त आयोगाच्या शिफारशी स्विकृत.
4) दिल्लीला राष्ट्रीय राजधानी भूप्रदेशाचा दर्जा
(ASO मुख्य 2013)

12 / 69

Category: घटनादुरूस्ती

12. 108 व्या घटनादुरुस्ती विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) ते लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभेमध्ये महिलांसाठी एकतृतीयांश राखीव जागेसंबंधी होते.
ब) राज्यसेभेने ते विधेयक 9 मार्च, 2010 रोजी मंजूर केले होते.
क) लोकसभेने विधेयकावर कधीच मतदान केले नाही.
ड) 15 व्या लोकसभेच्या विसर्जनानंतर ते रद्द झाले.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2017)

13 / 69

Category: घटनादुरूस्ती

13. राज्यघटनेच्या अनुच्छेद 326 मध्ये 61 वी दुरुस्ती करून - - - - - - व्यवस्था करण्यात आली.
(Agri 2012)

14 / 69

Category: घटनादुरूस्ती

14. खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
अ) भारतात, घटना दुरूस्ती विधेयक केवळ राष्ट्रपतीच्या पूर्व- परवानगीने संसदेमध्ये मांडले जावू शकते.
ब) अमेरिकेत प्रत्येक घटना दुरूस्तीस किमान दोन-तृतीयांश घटक राज्यांच्या विधिमंडळाद्वारे मान्यता मिळणे आवश्यक असते.
क) स्वित्झर्लंड मध्ये राज्यघटनेमध्ये केलेला बदल सार्वमताचा अवलंब केल्याशिवाय अंमलात येवू शकत नाही.
ड) ऑस्ट्रेलियात, राज्यघटनेनं-" पूर्ण बहुमताने केलेल्या कायद्याद्वारे करता येतो.
(राज्यसेवा पूर्व, 2020)

15 / 69

Category: घटनादुरूस्ती

15. राज्यघटनेच्या अनुच्छेद-368 संबंधी खालील विधाने विचारात घ्या :
अ) राष्ट्रपतीच्या पूर्व परवानगीने घटनादुरूस्ती विधेयक मंत्री किंवा संसदेचा कोणताही सभासद मांडू शकतो.
ब) घटनादुरूस्ती विधेयकास मंजुरी देण्याबाबत संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये कोंडी निर्माण झाल्यास संयुक्त बैठक घेण्याची तरतूद आहे.
क) अनुच्छेद-368 अन्वये मंजूर झालेल्या घटनादुरूस्ती विधेयकास मान्यता देण्याचे बंधन राष्ट्रपतीवर नसते.
ड) राज्यघटनेच्या सातव्या परिशिष्टामध्ये बदल करण्यासाठी निम्म्या राज्य विधिमंडळांची मान्यता आवश्यक असते.
यापैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

16 / 69

Category: घटनादुरूस्ती

16. 103 व्या घटनादुरूस्तीबाबत खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?
(राज्यसेवा मुख्य, 2020)

17 / 69

Category: घटनादुरूस्ती

17. विधान (A) : राज्यघटना हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे.
कारण (R) : जर घटनादुरुस्तीची प्रक्रिया ताठर असेल तरच राज्य घटनेने केलेले सत्ता विभाजन आणि राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व राखले जाईल.
(राज्यसेवा मुख्य 2017)

18 / 69

Category: घटनादुरूस्ती

18. भारतीय राज्यघटनेचे कलम क्रमांक 368 खालीलपैकी कोणत्या प्रकारे बदलता येते ?
(ASO मुख्य 2016)

19 / 69

Category: घटनादुरूस्ती

19. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मुलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली?
(संयुक्त गट 'क' पूर्व 2022)

20 / 69

Category: घटनादुरूस्ती

20. कोणत्या वर्षी कोणत्या घटनादुरुस्तीने भारतात मतदारांची वयोमर्यादा 21 वर्षावरून 18 वर्षे करण्यात आली ?
(करसहाय्यक मुख्य 2017)

21 / 69

Category: घटनादुरूस्ती

21. राष्ट्रीय न्यायिक नियुक्ति आयोग सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवल्यामुळे कोणती घटनादुरुस्ती घटनाबाह्य झाली आहे ?
(ASO पूर्व 2016)

22 / 69

Category: घटनादुरूस्ती

22. खालीलपैकी कोणत्या बाबींवर संसदेच्या 'साध्या बहुमताने' घटनादुरुस्ती करणे शक्य होते ?
अ) नागरिकत्व
ब) राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
क) मतदार संघाचे परिसीमन
ड) मूलभूत हक्क
ई) आदिवासी क्षेत्राचे प्रशासन
(STI मुख्य 2018)

23 / 69

Category: घटनादुरूस्ती

23. योग्य जोड्या लावा.
'अ' (घटनादुरुस्ती)
अ) 10 वी घटनादुरुस्ती
ब) 21 वी घटनादुरुस्ती
क) 52 वी घटनादुरुस्ती
ड) 101 वी घटनादुरुस्ती
'ब' (तपशील)
1) वस्तू व सेवा कर
2) पक्षांतर बंदी कायदा
3) दादरा व नगर हवेलीचा केंद्रशासित प्रदेश म्हणून समावेश
4) सिंधी भाषेचा कार्यालयीन भाषा म्हणून समावेश
(Exise-PSI पूर्व 2017)

24 / 69

Category: घटनादुरूस्ती

24. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा :
अ) 2011 साली 97 व्या घटनादुरूस्तीद्वारे 'सहकारी संस्था' हा विषय राज्यघटनेत समाविष्ट करण्यात आला.
ब) अनुच्छेद 19(1)(c) मध्ये 'सहकारी संस्था' स्थापन करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला.
क) लॉर्ड कर्झन यांच्या कारकिर्दीत भारतातील पहिला सहकारी कायदा पारीत केला गेला.
(राज्यसेवा पूर्व, 2022)

25 / 69

Category: घटनादुरूस्ती

25. संसदेने पक्षांतरबंदी कायदा कोणत्या घटनादुरुस्ती कायद्यानुसार संमत केला आहे ?
(संयुक्त गट- क 2018)

26 / 69

Category: घटनादुरूस्ती

26. खालील विधाने लक्षात घ्या.
अ) 1951 ला संविधानात पहिली दुरुस्तीद्वारे अनुच्छेद 15(4) चा समावेश करण्यात आला.
ब) चंपकम दोराईजन विरुद्ध मद्रास राज्य खटल्यात जातिआधारित आरक्षणास विरोध करण्यात आला होता.
(Ind. Ins. Mains 2022)

27 / 69

Category: घटनादुरूस्ती

27. मतदानाचे वय 21 वरून 18 वर्षापर्यंत कमी करण्यासंबंधित घटनादुरुस्ती कोणती आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2018)

28 / 69

Category: घटनादुरूस्ती

28. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा :
अ) समतेचे तत्त्व ब) स्वातंत्र्याचे तत्त्व
क) संघराज्य ड) समाजवादी संरचना
इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार
फ) धर्मनिरपेक्षता
(राज्यसेवा मुख्य 2014)

29 / 69

Category: घटनादुरूस्ती

29. कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे राज्य विधान सभेत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी 2020 पर्यंत जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत ?
(SIT मुख्य 2016)

30 / 69

Category: घटनादुरूस्ती

30. सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्ट्यांना संविधानाची पायाभूत वैशिष्ट्ये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्ट्यांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?
अ) समतेचे तत्त्व
ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
क) संघराज्य
ड) सार्वभौमत्त्व
(राज्यसेवा मुख्य 2015)

31 / 69

Category: घटनादुरूस्ती

31. विधान (A) : भारतीय राज्यघटनेच्या 368 व्या कलमानुसार घटनादुरुस्तीची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे.
कारण (R) : भारतीय राज्यघटनेत घटनादुरुस्तीच्या विविध पद्धती सांगितल्या आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2013)

32 / 69

Category: घटनादुरूस्ती

32. 44 वी घटनादुरूस्ती अधिनियम 1978 द्वारे खालीलपैकी कोणत्या तरतुदी करण्यात आल्या आहेत ?
अ) अखिल भारतीय न्यायिक सेवा निर्माण करण्याबाबत तरतूद करण्यात आली.
ब) मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला एकदा पुनर्विचारार्थ परत पाठविण्याचा राष्ट्रपतीस अधिकार देण्यात आला.
क) राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात अनुच्छेद 20 आणि अनुच्छेद 21 अन्वये हमी दिलेले मुलभूत अधिकार निलंबित करता येणार नाहीत अशी तरतूद करण्यात आली.
ड) राज्यसूचीतील पाच विषय समवर्ती सूचीत हलविण्यात आले.
(राज्यसेवा पूर्व 2022)

33 / 69

Category: घटनादुरूस्ती

33. भारतीय राज्यघटना दुरुस्ती प्रक्रियेत खालीलपैकी कोणाचा सहभाग असतो ?
(ASO मुख्य 2012)

34 / 69

Category: घटनादुरूस्ती

34. खालीलपैकी कोणत्या बाबींमध्ये राज्यघटनेत दुरुस्ती करणे किमान निम्म्यापेक्षा कमी नसलेल्या विधानसभेच्या मान्यतेने शक्य होते ?
अ) राष्ट्रपतींची निवडणूक
ब) घटक राज्यांचे संसदेतील प्रतिनिधित्व
क) संविधानाच्या 7 व्या परिशिष्टातील सूची
ड) राज्याची विधान परिषद रद्द करणे
(ASO पूर्व 2015)

35 / 69

Category: घटनादुरूस्ती

35. जुळणी करा :
अ) लोकसभा आणि विधानसभांचे मतदारसंघ 2026 सालापर्यंत यथास्थिती राहतील.
ब) अनुसूचित जातींसाठी व अनुसूचित जमातींसांठी स्वतंत्र राष्ट्रीय आयोग.
क) केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्र्यांची संख्या (पंतप्रधानासहित) व राज्य मंत्रीमंडळातील मंत्र्यांची संख्या (मुख्यमंत्रीसहित)
अनुक्रमे लोकसभेच्या सदस्य संख्येच्या आणि विधानसभेच्या सदस्य संख्येच्या 15% हून अधिक असणार नाही.
ड) राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टात बोडो, डोग्री, मैथिली आणि संथाली भाषांचा समावेश.
1) 89 वी घटनादुरुस्ती
2) 92 वी घटनादुरुस्ती
3) 87 वी घटनादुरुस्ती
4) 91 वी घटनादुरुस्ती
(राज्यसेवा मुख्य 2014)

36 / 69

Category: घटनादुरूस्ती

36. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
(ASO मुख्य 2017)

37 / 69

Category: घटनादुरूस्ती

37. कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे शिक्षणाचा अधिकार मुलभूत अधिकारांमध्ये समाविष्ट करण्यात आला ?
(STI मुख्य 2014)

38 / 69

Category: घटनादुरूस्ती

38. 97 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाद्वारे ...... या संबंधीच्या मार्गदर्शक तत्त्वाचा नव्याने समावेश करण्यात आला.
(STI मुख्य 2015)

39 / 69

Category: घटनादुरूस्ती

39. भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत राज्यघटनेत दुरुस्तीद्वारे बदलता येवू शकते, त्यासाठी घटनादुरुस्तीद्वारे बदलता येवू शकते, त्यासाठी घटना दुरुस्ती - - - - - - द्वारे मंजूर होणे आवश्यक असते.
(राज्यसेवा मुख्य 2017)

40 / 69

Category: घटनादुरूस्ती

40. महिलांकरिता राखीव जागा ठेवण्यासाठी घटनेची कितवी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे?
(ASO पूर्व 2011)

41 / 69

Category: घटनादुरूस्ती

41. खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाची दोन स्वतंत्र
संस्थामध्ये विभागणी करण्यात आली ?
(Agri पूर्व 2018)

42 / 69

Category: घटनादुरूस्ती

42. भारतीय राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेची सुरुवात खालीलपैकी कोण करते ?
अ) लोकसभा ब) राज्यसभा
क) पंतप्रधान ड) राष्ट्रपती
इ) कायदा मंत्री
(राज्यसेवा मुख्य 2018)

43 / 69

Category: घटनादुरूस्ती

43. राज्यघटनेच्या कोणत्या घटनादुरुस्तीने संसदेला प्रशासनिक न्यायाधिकरणे स्थापन करण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

44 / 69

Category: घटनादुरूस्ती

44. कोणत्या संविधानिक घटनादुरुस्तीने शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांची भरती आणि सेवा/अटींसंदर्भातील विवादांच्या निवाड्यासाठी 'न्यायाधिकरणाच्या' स्थापनेची तरतूद केली आहे ?
(Forest मुख्य 2018)

45 / 69

Category: घटनादुरूस्ती

45. घटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये घटनादुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे ?
(ASO मुख्य 2011)

46 / 69

Category: घटनादुरूस्ती

46. वस्तू व सेवा कर (GST) विधेयकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :
अ) ते 122 वे घटनादुरुस्ती विधेयक होते.
ब) ते 101 वे घटनादुरुस्ती अधिनियम 2016 आहे.
क) जी. एस.टी. विधेयकाला मान्यता देणारे आसाम हे पहिले राज्य होते.
ड) जी.एस.टी. विधेयकाला मान्यता देणारे राष्ट्रीय लोकशाही आघाडी-रहित (Non-NDA) बिहार हे पहिले राज्य होते.
(ASO मुख्य 2016)

47 / 69

Category: घटनादुरूस्ती

47. खालील विधाने विचारात घ्या.
अ) 03 व्या घटनादुरुस्ती अधिनियम -2009 अन्वये लोकसभा आणि राज्याच्या विधाक्सथेतील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी राखीव जागांची मुदत 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
ब) भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद-114 बात स्थानिक संस्थांमध्ये महिलांसाठी राखीव जागेची तरतूद नाही आणि म्हणून महिलांसाठी राखीव जागा या विशिष्ट मुदतीसाठी मर्यादित नाहीत.
(ASO मुख्य 2017)

48 / 69

Category: घटनादुरूस्ती

48. भारतीय राज्यघटनेची नव्याण्णवावी घटनादुरुस्ती, 2014 - - - - - - या बाबींशी संबंधित आहे.
(राज्यसेवा मुख्य 2016)

49 / 69

Category: घटनादुरूस्ती

49. भारतीय राज्यघटनेतील 120 वी दुरुस्ती विधेयक कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
(PSI पूर्व 2014)

50 / 69

Category: घटनादुरूस्ती

50. 123 क्रमांकाचे संविधान दुरुस्ती विधेयक 2017 कशाशी संबंधित आहे ?
(ASO मुख्य 2019)

51 / 69

Category: घटनादुरूस्ती

51. भारतीय संविधानात केलेली घटनादुरूस्ती
अ) 10 वी घटनादुरूस्ती - दादरा, नगर हवेली भारतीय संघराज्यात समाविष्ट
ब) 12 वी घटनादुरूस्ती - गोवा, दमन आणि दीव भारतीय संघराज्यात एकीकृत
क) 15 वी घटनादुरूस्ती - उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ 60 वर्षांहून 62 वर्ष करण्यात आला.
ड) 16 वी घटनादुरूस्ती - केंद्रशासित प्रदेश पांडिचेरी व मणिपूर साठी विधानसभेची व्यवस्था
वरीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही ?
(राज्यसेवा मुख्य, 2022)

52 / 69

Category: घटनादुरूस्ती

52. खालीलपैकी कोणती तरतूद ही 1956 च्या 7 व्या घटनादुरुस्ती कायद्याद्वारे करण्यात आलेली नाही?
(Forest मुख्य 2018)

53 / 69

Category: घटनादुरूस्ती

53. भारतीय राज्यघटनेच्या 'मूलभूत चौकटी' च्या तत्त्वातून ...... व्यक्त होते.
(राज्यसेवा पूर्व 2015)

54 / 69

Category: घटनादुरूस्ती

54. भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी पुढीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

55 / 69

Category: घटनादुरूस्ती

55. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
अ) 61 व्या घटनादुरुस्तीने मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले आहे.
ब) 73 व्या घटनादुरुस्तीने पंचायतमध्ये महिलांकरिता 30% आरक्षण दिले गेले.
(Forest मुख्य 2014)

56 / 69

Category: घटनादुरूस्ती

56. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गांच्या संदर्भात असलेल्या 2021 च्या 105 व्या घटनादुरूस्ती कायद्याने भारतीय संविधानाच्या - - - - - - कलमां मध्ये बदल केले आहेत.
(राज्यसेवा पूर्व 2021)

57 / 69

Category: घटनादुरूस्ती

57. खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारतीय संविधानामध्ये 368 व्या कलमांतर्गत संविधान दुरुस्तीची तरतूद करण्यात आली आहे.
ब) 2012 पर्यंत भारतीय संविधानात 98 दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत.
क) संविधान दुरुस्ती विधेयक सादर करताना राष्ट्रपतींची पूर्वसंमती आवश्यक असते.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(राज्यसेवा मुख्य 2015)

58 / 69

Category: घटनादुरूस्ती

58. खालीलपैकी कोणत्या जोड्या बरोबर आहे ?
अ (घटनादुरुस्ती) ब (विषय)
अ) 52 वी घटनादुरुस्ती : पक्षांतर बंदी कायदा
ब) 56 वी घटनादुरुस्ती : गोव्याला राज्य दर्जा
क) 59 वी घटनादुरुस्ती : पंजाबमध्ये आणीबाणी
ड) 62 वी घटनादुरुस्ती : अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षण
(MES पूर्व 2017)

59 / 69

Category: घटनादुरूस्ती

59. 24 व्या घटनादुरुस्तीनुसार :
अ) मूलभूत हक्कांसह राज्यघटनेतील कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करण्याच्या संसदेच्या अधिकाराचा पुनरुच्चार करण्यात आला.
ब) घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणे. राष्ट्रपतींवर बंधनकारक करण्यात आले.
क) कलम 31 मध्ये 'भरपाई' या शब्दाऐवजी 'रक्कम' हा शब्द समाविष्ट करण्यात आला.
(राज्यसेवा मुख्य 2016)

60 / 69

Category: घटनादुरूस्ती

60. खालीलपैकी कोणत्या खटल्याचा परिणाम म्हणून संसदेने 24 वी घटना दुरुस्ती कायदा संमत केला?
(राज्यसेवा पूर्व 2014)

61 / 69

Category: घटनादुरूस्ती

61. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणत्या तरतूदी साध्या बहुमताने दुरुस्त करता येतात ?
(Forest मुख्य 2016)

62 / 69

Category: घटनादुरूस्ती

62. भारताच्या संविधानाची 83 वी घटना दुरुस्ती काय सुचविते ?
(PSI मुख्य 2013)

63 / 69

Category: घटनादुरूस्ती

63. प्रतिपादन (A) : केशवानंद भारती वि. केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे जाहीर केले की घटनेच्या मूलभूत संरचनेत दुरुस्ती करता येणार नाही.
कारण (R) : सर्वोच्च न्यायालयाने, संसदीय सार्वभौमत्त्व आणि न्यायालयीन पुनर्विलोकन यामध्ये संतुलन आणले.
(राज्यसेवा मुख्य 2012)

64 / 69

Category: घटनादुरूस्ती

64. भारतीय राज्यघटनेतील 61 वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?
अ) मतदाराची वयोमर्यादा 21 वरून 18 वर्ष करणे.
ब) निवडणूक आयुक्ताची संख्या ठरविणे.
क) निवडणुकीतील गुन्हेगारी प्रवृत्तिंना आळा घालणे.
ड) अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी आरक्षण.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहेत ?
(ASO मुख्य 2015)

65 / 69

Category: घटनादुरूस्ती

65. भारतीय राज्यघटने संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
अ) अनुच्छेद 368 अनुसार राज्यघटना दुरुस्त करावयाची असल्यास संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या दोन-तृतीयांश बहुमताची आवश्यकता असते.
ब) घटक राज्यात एखादे विधेयक हे अर्थ विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उपस्थित झाल्यास राज्यपालांनी दिलेला निर्णय अंतीम असतो.
क) कोणत्याही विभागीय अथवा प्रशासनिक खटल्यासह सर्व खटल्यात कोणत्याही व्यक्तिस एकाच गुन्ह्यासाठी एकापेक्षा अधिक वेळी आरोपी केले जाणार नाही व एकापेक्षा अधिक वेळा शिक्षा दिली जाणार नाही.
खाली दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तराची निवड करा.
(ASO Mains 2022)

66 / 69

Category: घटनादुरूस्ती

66. कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाचे दोन आयोगामध्ये विभाजन केले गेले ?
(राज्यसेवा मुख्य 2016)

67 / 69

Category: घटनादुरूस्ती

67. भारतीय संविधानाच्या कोणत्या तरतुदीनुसार मंऱ्यांची संख्या मर्यादित होते ?
(ASO मुख्य 2017)

68 / 69

Category: घटनादुरूस्ती

68. खालीलपैकी कोणत्या बाबतीत केवळ निम्म्यापेक्षा कमी नाही इतक्या घटक राज्यांच्या विधिमंडळाच्या मान्यतेने घटनादुरुस्ती करणे शक्य होते ?
(ASO मुख्य 2017)

69 / 69

Category: घटनादुरूस्ती

69. कोणत्या खटल्यान्वये सर्वोच्च न्यायालयाने कलम 368 नुसार घटनेच्या मूलभूत गाभ्याला धक्का न लावता घटनेच्या कोणत्याही भागात दुरुस्ती करण्याचा अधिकार संसदेला असल्याचे मान्य केले ?
(ASO मुख्य 2013)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top