44

Polity

राष्ट्रपती

1 / 60

Category: राष्ट्रपती

1. खालील विधाने विचारात घ्या :
अ) राष्ट्रपतीला कायद्यासंदर्भातील अथवा जनहितार्थ मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नसतो.
ब) राष्ट्रपतीला संघ लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष अथवा सदस्य यांना पदावरून दूर करण्याच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो.
(राज्यसेवा मुख्य 2016)

2 / 60

Category: राष्ट्रपती

2. राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?
(ASO मुख्य 2014)

3 / 60

Category: राष्ट्रपती

3. खालील विधाने विचारात घ्या :
अ) राष्ट्रपतीला, संघराज्याच्या कार्यकारी अधिकाराच्या व्याप्तीत येईल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्ये राज्य शासनाच्या संमतीशिवाय त्या शासनाकडे किंवा त्याच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनशर्त सोपवता येतील.
ब) एखाद्या राज्याच्या राज्यपालाला राज्याच्या कार्यकारी · अधिकाराच्या व्याप्तीत येत असेल अशा कोणत्याही बाबी संबंधीची कार्ये, भारत सरकारच्या संमतीने, त्या सरकारकडे किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांकडे सशर्त अथवा बिनाशर्त सोपवता येतील.
(ASO मुख्य 2017)

4 / 60

Category: राष्ट्रपती

4. योग्य क्रम लावा : (भारताचे राष्ट्रपती)
अ) नीलम संजीव रेड्डी
ब) आर. वेंकटरमण
क) ग्यानी झैल सिंग
ड) डॉ. एफ. ए. अहमद
(राज्यसेवा मुख्य 2015)

5 / 60

Category: राष्ट्रपती

5. जर एखादे राज्य केंन्द्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन करण्यात अपयशी ठरले तर राष्ट्रपती काय करतील ?
(ASO मुख्य 2018)

6 / 60

Category: राष्ट्रपती

6. भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता?
(राज्यसेवा मुख्य 2013)

7 / 60

Category: राष्ट्रपती

7. खालील विधाने विचारात घ्या :
अ) अयोग्य हेतू (malafide) या आधारावर राष्ट्रपतीच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो.
ब) अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गतकालापासून लागू होऊ शकतो.
क) राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2016)

8 / 60

Category: राष्ट्रपती

8. खालीलपैकी कोणत्या मान्यवरांस पदग्रहण करण्यापूर्वी भारतीय राज्यघटनेचे रक्षण करण्याची शपथ घ्यावी लागते ?
अ) राष्ट्रपती
ब) उपराष्ट्रपती
क) पंतप्रधान
ड) लोकसभा सभापती
(ASO मुख्य 2017)

9 / 60

Category: राष्ट्रपती

9. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) अध्यादेशाने - संसदेच्या कायद्यापेक्षा अधिक प्रमाणात मूलभूत हक्कांचे उल्लंघन केले जावू शकत नाही.
ब) अध्यादेश - पूर्वलक्षी प्रभावाचा किंवा संसदेचा कोणताही कायदा दुरुस्त करणारा किंवा रद्द करणारा असू शकतो.
क) अध्यादेशाचा अधिकार राष्ट्रपती मंत्रीमंडळाच्या सल्ल्याशिवाय वापरू शकतात.
(ASO मुख्य 2019)

10 / 60

Category: राष्ट्रपती

10. भारताच्या राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्य सेवा कायद्याला…….... साली मान्यता दिली.
(Forest मुख्य 2017)

11 / 60

Category: राष्ट्रपती

11. राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी उमेदवाराच्या पात्रतेसंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे?
अ) भारतीय नागरिक आणि वयाची 30 वर्षे पूर्ण.
ब) राज्यसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास ती व्यक्ती पात्र असली पाहिजे.
क) नामांकन भरणाऱ्या उमेदवाराचे नाव किमान दहा मतदारांनी सुचविली पाहिजे.
(लिपीक व टंकलेखन (मुख्य) 2017)

12 / 60

Category: राष्ट्रपती

12. विधान (A) : भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.
कारण (R) : ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.
(राज्यसेवा मुख्य 2013)

13 / 60

Category: राष्ट्रपती

13. खालीलपैकी कुठल्या भारतीय राष्ट्रपतींनी पॉकेट वेटोचा वापर केला आहे ?
(राज्यसेवा मुख्य 2017)

14 / 60

Category: राष्ट्रपती

14. खालील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?
अ) आतापावेतो नियमित राष्ट्रपती म्हणून डॉ. झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला.
ब) डॉ. झाकीर हुसेन व श्री. फकरुद्दीन अली अहमद हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणूनचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत.
(राज्यसेवा मुख्य 2014)

15 / 60

Category: राष्ट्रपती

15. खालील विधाने विचारात घ्या.
अ) संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 रोजी झाली.
ब) संयुक्त राष्ट्र संघटनेचे मुख्यालय वॉशिंग्टन येथे आहे.
क) संयुक्त राष्ट्र संघटनेचे सद्यस्थितीत 193 देश सभासद आहेत.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(लिपिक टंकलेखन (पूर्व) 2017)

16 / 60

Category: राष्ट्रपती

16. ...........ची मर्जी असेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहू शकतात.
(PSI पूर्व 2011)

17 / 60

Category: राष्ट्रपती

17. खालीलपैकी कोणत्या कलमान्वये राष्ट्रपती भारतातील सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या लोकांची परिस्थिती शोधण्यासाठी आयोग नेमू शकतात?
(PSI मुख्य 2012)

18 / 60

Category: राष्ट्रपती

18. "आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे."राष्ट्रपतीच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?
(राज्यसेवा मुख्य 2013)

19 / 60

Category: राष्ट्रपती

19. राष्ट्रपतींच्या अधिकारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
अ) राष्ट्रपती सर्व सैन्य दलांचे सरसेनापती असतात.
ब) राज्यसभेत 12 सभासदांची नियुक्ती राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकारात करतात.
क) राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक अधिवेशनाच्या सुरुवातीला दोन्ही सभागृहासमोर अभिभाषण देऊ शकतात.
ड) राष्ट्रपती परदेशात भारताचे प्रतिनिधित्व करतात.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(ASO मुख्य 2015)

20 / 60

Category: राष्ट्रपती

20. योग्य कथने ओळखा :
अ) कोर्ट मार्शल बाबतचे सर्व अधिकार राष्ट्रपतीला आहे.
ब) कोर्ट मार्शल बाबतचे काही अधिकार राज्यपालाला आहे.
क) मृत्यू दंडाची शिक्षा राष्ट्रपती क्षमा करू शकतात.
ड) मृत्यू दंडाची शिक्षा राज्यपाल सुद्धा करू शकतात.
(ASO मुख्य 2019)

21 / 60

Category: राष्ट्रपती

21. भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?
(ASO मुख्य 2013)

22 / 60

Category: राष्ट्रपती

22. राज्य विधिमंडळाने संमत केलेले विधेयक राज्यपाल राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवू शकतात. राष्ट्रपती -
अ) विधेयकाला मान्यता देतात अथवा मान्यता राखून ठेवू शकतात.
ब) राज्य विधिमंडळाकडे पुनर्विचारार्थ ते विधेयक परत पाठवू शकतात.
क) राष्ट्रपतीकडून परत आलेल्या विधेयकावर राज्य विधिमंडळाने तीन महिन्यात पुनर्विचार केलाच पाहिजे आणि जर पुन्हा ते विधेयक मंजूर केले तर राष्ट्रपतीवर त्यास संमती देणे बंधन कारक असते.
ड) पुनर्विचारार्थ परत आलेले विधेयक जर राज्य विधिमंडळाने पुन्हा मंजूर केले तर राष्ट्रपतीने त्यास सहा महिन्यांच्या कालावधीत संमती दिली पाहिजे.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(राज्यसेवा पूर्व 2019)

23 / 60

Category: राष्ट्रपती

23. भारताच्या राष्ट्रपतीच्या स्थानाबाबतची मते आणि त्यांची उगमस्थाने यांची जुळणी करा :
अ) राज्याचा प्रमुख, परंतु कार्यकारिणीचा प्रमुख नाही.
ब) कार्यकारिणीचा नामधारी आणि घटनात्मक प्रमुख.
क) नामधारी प्रमुख नाही
ड) भव्य शुन्याप्रमाणे आहे असे वाटत नाही.
1) सर्वोच्च न्यायालय, राम जावया वि. पंजाब राज्य (1955)
2) के. एम. मुन्शी नामधारी
3) एच. एन. पंडीत
4) डॉ. बी. आर. आंबेडकर
(Forest मुख्य 2015)

24 / 60

Category: राष्ट्रपती

24. खालील राष्ट्रपतींचा त्यांच्या पदनियुक्तीनुसार क्रम लावा:
अ) डॉ. राधाकृष्णन
ब) डॉ. झाकीर हुसेन
क) डॉ. राजेंद्र प्रसाद
ड) ग्यानी झैलसिंग
(Agri 2012)

25 / 60

Category: राष्ट्रपती

25. नकाराधिकाराच्या प्रकाराबाबत जोड्या लावा.
अ) निरंकुश नकाराधिकार
ब) गुणात्मकनकाराधिकार
क) तात्पुरता नकाराधिकार
ड) पॉकेट नकाराधिकार
1) विधेयकास मंजूरी अथवा नकार न देणे, अथवा ते परत न पाठविणे.
2) कायदेमंडळ यावर साध्या बहुमताच्या आधारे मात करू शकते.
3) कायदेमंडळ यावर विशेष बहुमताच्या आधारे मात करू शकते.
4) विधेयकाला मान्यता देण्याबाबत कोणतीही कृती न करणे.
(राज्यसेवा पूर्व 2016)

26 / 60

Category: राष्ट्रपती

26. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?
(राज्यसेवा मुख्य 2014)

27 / 60

Category: राष्ट्रपती

27. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणूकीत विविध राज्यातील आमदारांच्या मताचे मूल्य खालील सूत्रानुसार निश्चित होत असतात.
(ASO Mains 2022)

28 / 60

Category: राष्ट्रपती

28. सर्वोच्च न्यायलयाने विविध खटल्यांमध्ये राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराचे परीक्षण करून काही तत्त्वे प्रस्तुत केली आहेत :
अ) दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतीद्वारे मौखिक सुनावणी करण्याची हक्क नाही.
ब) राष्ट्रपती नव्याने पुरावे तपासू शकत नाहीत. क) राष्ट्रपतीने या अधिकाराचा वापर आपल्या विवेकाधिन अधिकाराने करावा.
ड) राष्ट्रपती आपल्या आदेशाबाबत खुलासा करण्यास बांधील नाहीत.
इ) राष्ट्रपती त्यांना वाटणाऱ्या अनावश्यक कठोर शिक्षेपासुन मुक्तता तर देतीलच पण स्पष्ट चुकांपासूनही दोषमुक्त करू शकतील.
वरीलपैकी कोणते बरोबर नाहीत ?
(ASO मुख्य 2015)

29 / 60

Category: राष्ट्रपती

29. राष्ट्रपतीच्या निवडणूक प्रक्रियेची ठळक वैशिष्टये कोणती?
अ) प्रत्यक्ष निवडणूक
ब) एकल संक्रमणीय मतपद्धती
क) आवश्यक मतांचा कोटा
ड) अप्रमाणशीर प्रतिनिधित्वाचे तत्त्व
योग्य पर्याय निवडा :
(वनसेवा मुख्य 2019)

30 / 60

Category: राष्ट्रपती

30. खालीलपैकी कोणता नकाराधिकार भारताचे राष्ट्रपती वापरू शकत नाहीत ?
(ASO मुख्य 2018)

31 / 60

Category: राष्ट्रपती

31. खालील विधाने विचारात घ्या :
अ) भारताच्या राष्ट्रपतीस महाभियोगाच्या प्रक्रियेद्वारे पदावरून दूर केले जावू शकते. महाभियोग प्रक्रियेसाठी अनुच्छेद 61 मध्ये फक्त गैरवर्तणूक आणि अकार्यक्षमता ही दोनच कारणे नमूद केलेली आहेत.
ब) महाभियोगाचा ठराव संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने मंजूर होणे आवश्यक असते म्हणजेच प्रत्येक सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या (निम्म्या पेक्षा जास्त) बहुमताने आणि हजर राहून मतदान करणाऱ्या दोन-तृतीयांश सभासदांच्या बहुमताने.
(राज्यसेवा मुख्य, 2022)

32 / 60

Category: राष्ट्रपती

32. राष्ट्रपतींकडून पंतप्रधानाची निवड खालीलपैकी कोणत्या निकषांवर केली जाते ?
अ) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमतकारी पक्षाची नेता असावी.
ब) ती व्यक्ती राष्ट्रपतींच्या मर्जीतील असावी.
क) ती व्यक्ती लोकसभेतील बहुमताचा विश्वास प्राप्त करू शकणारी असावी.
ड) संबंधित व्यक्तीच्या पक्षाला लोकसभा किंवा राज्यसभेत बहुमत असले पाहिजे.
(ASO पूर्व 2013)

33 / 60

Category: राष्ट्रपती

33. खालील विधाने विचारात घ्या.
अ) भारताच्या राष्ट्रपतींची निवड लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांकडून केली जाते.
ब) भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात.
क) भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात.
वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/त ?
(लिपीक व टंकलेखन (पूर्व) 2017)

34 / 60

Category: राष्ट्रपती

34. जोड्या लावा (राष्ट्रपतीचे अधिकार) :
'अ'
अ) भारताच्या संपूर्ण किंवा एखाद्या भागात आणीबाणी
ब) महसुलाच्या वितरणावर बंधने किंवा प्रतिबंध
क) मुलभूत अधिकाराच्या अंमलबजावणीस स्थगिती
ड) वित्तीय आणीबाणीची घोषणा
'ब'
1) अनुच्छेद 360
2) अनुच्छेद 354
3) अनुच्छेद 352
4) अनुच्छेद 359
(ASO मुख्य 2019)

35 / 60

Category: राष्ट्रपती

35. भारताचे राष्ट्रपती राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदातील तरतुदींनुसार सर्वोच्च न्यायालयाकडून सल्ला मागवू शकतात ?
(राज्यसेवा पूर्व, 2022)

36 / 60

Category: राष्ट्रपती

36. भारताच्या राष्ट्रपतीच्या स्थानाबाबतची मते आणि त्यांची उगमस्थाने यांची जुळणी करा :
अ) राज्याचा प्रमुख, परंतु कार्यकारिणीचा प्रमुख नाही.
ब) कार्यकारिणीचा नामधारी आणि घटनात्मक प्रमुख
क) नामधारी प्रमुख नाही
ड) भव्य शुन्याप्रमाणे आहे असे वाटत नाही.
1) सर्वोच्च न्यायालय, राम जावया वि. पंजाब राज्य (1955)
2) के. एम. मुन्शी
3) एच. एन. पंडीत
4) डॉ. बी. आर. आंबेडकर
(Forest मुख्य 2014)

37 / 60

Category: राष्ट्रपती

37. भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये……..च्या निर्वाचित सदस्यांचा समावेश असतो.
(ASO मुख्य 2012)

38 / 60

Category: राष्ट्रपती

38. विधान (A) : भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीद्वारे होते.
कारण (B) : संसदीय शासन प्रकारात राज्यप्रमुख हा फक्त नाममात्र प्रमुख असतो.
(राज्यसेवा मुख्य 2013)

39 / 60

Category: राष्ट्रपती

39. भारतातील राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीकरिता उमेदवाराचे नामांकन………. कडून सूचित केले जाते.
(ASO मुख्य 2017)

40 / 60

Category: राष्ट्रपती

40. खालीलपैकी कोणते विधान /विधाने सत्य आहे /आहेत ?
अ) राष्ट्रपतीस त्यांच्या पदावरून फक्त संविधानाच्या उल्लंघनाबद्दल दर करता येते.
ब) महाभियोगासंबंधीच्या आरोपपत्राची सुरुवात फक्त कनिष्ठ सभागृहात कली जावू शकते.
क) आरोपपत्रावर सभागृहाच्या एक-तृतीयांश सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात.
ड) महाभियोगासंबंधी राष्ट्रपतीस एक महिन्याची पूर्वसूचना (नोटीस) द्यावी लागते.
इ) नामनिर्देशित सदस्य महाभियोग प्रक्रियेत सहभागी होवू शकत नाही.
(ASO मुख्य 2016)

41 / 60

Category: राष्ट्रपती

41. भारत सरकारचे कामकाज अधिक सोईस्कररित्या चालावे म्हणून राष्ट्रपतींना - - - - - करण्याचा अधिकार आहे.
(खालीलपैकी योग्य शब्द निवडा)
(ASO मुख्य 2014)

42 / 60

Category: राष्ट्रपती

42. अ) जर राज्य विधीमंडळाने मंजूर केलेले विधेयक राष्ट्रपतीने पुनर्विचारासाठी परत पाठविले आणि जर ते पुन्हा राज्य विधीमंडळाने मंजूर करून परत राष्ट्रपतीकडे संमतीसाठी पाठविले तर राष्ट्रपतीस त्या विधेयकाला संमती देणे बंधनकारक असते.
ब) राज्यपालाने राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकाबाबत निर्णय घेण्यासाठी राष्ट्रपतीस सहा महिन्यांचा कालावधी राज्यघटनेने निश्चित केला आहे.
(राज्यसेवा मुख्य 2019)

43 / 60

Category: राष्ट्रपती

43. राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणी घोषित करू शकतात.
अ) फक्त युद्ध अथवा परकीय आक्रमण प्रसंगी
ब) फक्त सशस्त्र बंड प्रसंगी.
क) फक्त अंतर्गत अशांतता प्रसंगी.
ड) फक्त पंतप्रधानांच्या लेखी सल्यानुसार.
वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(ASO मुख्य 2016)

44 / 60

Category: राष्ट्रपती

44. खालीलपैकी कोण राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीत थेट भाग घेत नाही ?
अ) लोकसभा आणि राज्यसभेचे निवडलेले सदस्य.
ब) राज्यांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य.
क) दिल्ली आणि पुडूचेरी या केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभांचे निर्वाचित सदस्य.
ड) राज्य विधान परिषदांचे निवडलेले आणि नामनिर्देशित सदस्य.
(राज्यसेवा पूर्व 2021)

45 / 60

Category: राष्ट्रपती

45. ए.पी.जे. अब्दुल कलाम जेव्हा भारताचे राष्ट्रपती म्हणून निवडून आले तेव्हा त्यांचे प्रतिस्पर्धी कोण होते ?
(Agri 2012)

46 / 60

Category: राष्ट्रपती

46. संसद सत्तासीन नसतांना राष्ट्रपतींनी काढलेल्या अध्यादेशाबाबत काय खरे नाही ?
अ) तो संसदेत ठेवला जाईल संसद सत्ताधीन झाल्यावर सहा आठवडे संपण्यापूर्वी तो अमान्य करणारा ठराव पारित केला गेल्यास ठराव अंमलात येईल.
ब) सहा आठवड्यानंतर वरीलप्रमाणे न घडल्यास राष्ट्रपतींचा अध्यादेश कायम होईल.
क) जर दोन्ही सभागृहे वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रीत केली गेली तर 6 आठवड्यांचा कालावधी त्यापैकी आधीच्या दिनांकापासून मोजण्यात येईल.
ड) जर दोन्ही सभागृह वेगवेगळ्या दिनांकांना अभिनिमंत्रित केली गेली तर 6 आठवड्यांचा कालावधी त्यापैकी नंतरच्या दिनांकापासून मोजण्यात येईल.
(राज्यसेवा मुख्य 2013)

47 / 60

Category: राष्ट्रपती

47. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकाराबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत ?
अ) दया याचना करणाऱ्या अर्जदाराला राष्ट्रपतींद्वारे मौखिक सुनावणी करण्याचा हक्क आहे.
ब) राष्ट्रपती कोर्ट मार्शल झालेल्या गुन्हेगाराला क्षमा कम शकतात.
क) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर केंद्रीय मंत्रीमंडळाच्या सल्ल्याशिवाय करू शकतात.
ड) राष्ट्रपती सर्व पुरावे नव्याने तपासू शकतात आणि न्यायालयापेक्षा वेगळा दृष्टीकोन मांडू शकतात.
(राज्यसेवा मुख्य 2016)

48 / 60

Category: राष्ट्रपती

48. भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते; ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली ?
(राज्यसेवा मुख्य 2012)

49 / 60

Category: राष्ट्रपती

49. ..... मिळून बनलेल्या निर्वाचक मंडळाकडून भारताचा राष्ट्रपती निवडला जातो.
अ) संसद व राज्यविधीमंडळाचे सर्व सदस्य
ब) संसदेच्या दोन्हीही सभागृहाचे निर्वाचित सदस्य
क) राज्य विधानसभेचे निर्वाचित सदस्य
ड) फक्त संसदेचे सदस्य खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :
(ASO Mains 2022)

50 / 60

Category: राष्ट्रपती

50. खालील जोड्या योग्यपणे जुळवा :
कलमे
अ) कलम -54
ब) कलम-53
क) कलम -58
ड) कलम-61
तरतुदी
1) केंद्रीय कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीचे ठिकाणी विहीत असेल
2) भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक साठी निर्वाचक मंडळ
3) भारताच्या राष्ट्रपतीवरील महाभियोग प्रक्रिया
4) भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूकी संबंधीची पात्रता
खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :
(ASO मुख्य 2019)

51 / 60

Category: राष्ट्रपती

51. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?
(PSI पूर्व 2012)

52 / 60

Category: राष्ट्रपती

52. खालीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे ?
अ) जर राष्ट्रपती व उपराष्ट्रपतींनी राजीनामा दिला, तर लोकसभेचे सभापती नवीन राष्ट्रपतींची निवड होईपर्यंत राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळतात.
ब) राष्ट्रपतींच्या निवडणूकीच्या संदर्भात किमान आणि कमाल वयोमर्यादा भारतीय संविधानात नमूद आहे.
क) भारतात राष्ट्रपती संसदेचा भाग आहेत.
(ASO मुख्य 2013)

53 / 60

Category: राष्ट्रपती

53. जर एखाद्या व्यक्तीची राष्ट्रपती म्हणून झालेली निवडणुक सर्वो च्च न्यायालयाने रद्दबातल केली तर त्या व्यक्तीने तत्पुर्वी केलेले आदेश:
(राज्यसेवा पूर्व 2013)

54 / 60

Category: राष्ट्रपती

54. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात ?
(राज्यसेवा पूर्व 2015)

55 / 60

Category: राष्ट्रपती

55. भारतात राष्ट्रपतीच्या निवडणूकीत मतदार कोण असतात ?
(STI पूर्व 2012)

56 / 60

Category: राष्ट्रपती

56. खालील विधाने लक्षात घ्या :
अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहीत आहे.
ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.
क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.
भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
(ASO पूर्व 2013)

57 / 60

Category: राष्ट्रपती

57. भारताच्या राष्ट्रपतीच्या निवडणूकीत ...... यांच्या मताचे मूल्य हे राज्यागणिक वेगवेगळे असते.
(STI मुख्य 2017)

58 / 60

Category: राष्ट्रपती

58. भारताचे राष्ट्रपती :
अ) भारतीय सशस्त्र दलांचे प्रमुख आहेत.
ब) कार्यकारी मंडळाचे भाग आहेत.
क) कायदेमंडळाचे भाग आहेत.
ड) भारताचे पहिले नागरिक आहेत.
(राज्यसेवा मुख्य, 2019)

59 / 60

Category: राष्ट्रपती

59. खाली दिलेल्या पर्यायांपैकी भारतीय राजकारणातील एक पुढारी ज्यांनी भारताच्या एका राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल व भारताचे उपराष्ट्रपती व राष्ट्रपती म्हणून जबाबदारी पार पाडली, त्या व्यक्तीचे नाव निवडा.
(करसहाय्यक मुख्य 2017)

60 / 60

Category: राष्ट्रपती

60. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने दोन वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे ?
(ASO मुख्य 2011)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top