42

General Mental Ability

Seating Arrangement Quiz

REVISION Is Important Than Reading...!!

1 / 52

Category: Seating Arrangement

1. P, Q, R, S, T, U, V आणि W हे मध्याकडे तोंड करुन वर्तुळाकार बसलेले आहेत. खालील विधाने लक्षात घेऊन प्रश्नाचे उत्तर निवडा :
(a) P हा T च्या उजवीपासून दुसरा आहे तसेच तो R आणि V चा सलग शेजारी आहे.
(b) S हा P चा शेजारी नाही
(c) V हा U चा शेजारी आहे.
(d) 'Q' हा S आणि W च्या मध्ये नाही. 'W' हा U आणि s च्या मध्ये नाही.
खालीलपैकी कोणते दोन शेजारी नाहीत ? (Combined Group B (Pre) - 2019) 

2 / 52

Category: Seating Arrangement

2. एका रांगेमध्ये 'A' डाव्या बाजूने 11 व्या स्थानावर आहे आणि 'B' उजव्या बाजूने 10 व्या स्थानावर आहे. जर 'A' आणि 'B' यांच्या जागांची अदलाबदल केली तर 'A' डाव्या बाजूने 18 व्या स्थानावर येतो. तर या रांगेमध्ये 'A' आणि 'B' खेरीज किती व्यक्ती असतील.  (CSAT - 2018)

3 / 52

Category: Seating Arrangement

3. अनिल, संजय, सुनिल, दीपक, महेश, प्रशांत आणि सुरेश ही मुले एका रांगेत बसली आहेत. सुनिल, दीपक व अनिलच्या मध्ये, महेश हा प्रशांत व सुरेशच्या मध्ये आणि संजय हा दीपक व प्रशांत यांच्यामध्ये आहे. अनिल व सुरेश दोन्ही टोकाला आहे, तर दीपक कोठे बसला आहे ? (तांत्रिक-पुर्व-2021) 

4 / 52

Category: Seating Arrangement

4. मनू मानी, मंजू व माली यांनी अर्थविज्ञान व इतिहास चाचण्या दिल्या. पुढे दिलेली तथ्ये वापरुन इतिहासात सर्वांत कमी गुण मिळवणारी व्यक्ती निवडा :
तथ्ये :
- मनू एकटीच अर्थविज्ञानात अनुत्तीर्ण असून तिने इतिहासात सर्वाधिक गुण मिळवून त्याची कसर भरुन काढली आहे.
- मानीने अर्थविज्ञानात मंजूवर मात केली आहे तर मंजू इतिहासात मानीपेक्षा उत्तम ठरली आहे. 
- मालीने तिची अर्थविज्ञानातील कामगिरी सुधारुन त्यात ती इतिहासापेक्षा एक क्रम वर आली आहे व मंजूला लागून वर आहे.  (ASO Main - 2016)

5 / 52

Category: Seating Arrangement

5. अंकिता ही संगितापेक्षा मोठी आहे. गिरीश हा संगितापेक्षा मोठा पण अंकितापेक्षा लहान आहे. शिरिष हा श्याम आणि संगितापेक्षा लहान आहे. संगिता ही श्यामपेक्षा मोठी आहे. त्यांच्यात सर्वात लहान कोण आहे ? (ASO Mains - 2017)

6 / 52

Category: Seating Arrangement

6. सात मुली वर्तुळाकारात केंद्राकडे तोंड करुन बसल्या आहेत. तानी, वाणी, रइसा, कॅटी, जया, पन्ना आणि साथी त्यांची नावे असून ही यादी त्यांच्या बैठकीत क्रमानुसार आहे, असे नाही. तानी आणि जया वगळता कोणीतरी साथी व कॅटीच्या दरम्यान बसली आहे. पन्ना ही वाणीच्या डावीकडून दुसरी आहे आणि रइसा पन्नाच्या उजवीकडून पाचवी आहे. जया, पन्ना किंवा वाणी बरोबर जोडी करु शकते.
जर जया व रइसा यांनी जागांची अदलाबदल केली तर पुढे दिलेल्या कोणत्या दोन मुली एकत्र काम करण्यासाठी जोडी करु शकणार नाहीत ?  (ASO Mains - 2016) 

7 / 52

Category: Seating Arrangement

7. एका प्रदर्शन कक्षात विविध रंगाच्या सात गाड्या उभ्या आहेत. निळ्या रंगाची गाडी ही पिवळ्या व जांभळ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. हिरव्या रंगाची गाडी लाल आणि पांढऱ्या रंगाच्या गाड्यांमध्ये उभी आहे. नारंगी रंगाची गाडी ही पिवळ्या रंगाच्या गाडीजवळ आहे, परंतु ती लाल किंवा जांभळ्या गाड्यांच्या जवळ नाही. तर पुढीलपैकी कोणता / ते निष्कर्ष खात्रीने सत्य आहेत ?
अ) पिवळ्या रंगाची गाडी केव्हाही निळ्या व नारंगी गाड्यांच्या मध्येच असणार.
ब) जांभळ्या रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच एकतर लाल रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची गाडी असणार.
क) नारंगी रंगाच्या गाडीच्या बाजूला नेहमीच पांढऱ्या रंगाची गाडी असणार. (STI Mains - 2017)

8 / 52

Category: Seating Arrangement

8. A, B, C आणि D हे मार्कच्या मळ्यात काम करतात. त्या सर्वांना मिळून त्याने एकूण वीस कलिंगडे दिली. त्यापैकी एकाला दोन मिळाली, दुसऱ्याला चार मिळाली, तिसऱ्याला सहा आणि चौथ्याला आठ मिळाली. A ला B पेक्षा जास्त कलिंगडे मिळाली. D ला C पेक्षा कमी कलिंगडे मिळाली. जर C ला D पेक्षा किमान दोन कलिंगडे जास्त मिळाली तर नेहमीच सत्य ठरेलच असे / अशी विधान / ने निवडा. (Combined Group C (Pre) - 2019) 
(a) A ला नेहमीच C पेक्षा जास्त कलिंगडे मिळतील
(b) C ला कधीही A ला मिळाली तितकी कलिंगडे मिळणार नाहीत.
(c) D ला त्याच्या बरोबर काम करणाऱ्या कोणाही व्यक्तिपेक्षा जास्त कलिंगडे मिळणे शक्य नाही
(d) B ला नेहमीच A पेक्षा कमी कलिंगडे मिळतील.

9 / 52

Category: Seating Arrangement

9. एका गोलमेज परिषदेत सहा व्यक्ती एका टेबलाच्या केंद्राकडे तोंड करुन बसलेले होते. त्यांची नावे आहेत अॅडी, बॉब, चार्ल्स, डग्लस, एलेना आणि फ्रेड अशी होती. बॉब हा चार्ल्स आणि एलेनाच्या मध्ये आणि अॅडीच्या समोर बसलेला आहे. डग्लस एलेनाच्या डावीकडे बसलेला आहे. डग्लसच्या डाव्या बाजुला बसलेली तिसरी व्यक्ती कोण आहे ? (Mhada - 2022) 

10 / 52

Category: Seating Arrangement

10. A, B, C, D, E आणि F एका ओळीत उभे आहेत. B हा F आणि D च्या मध्ये उभा आहे. E हा A आणि C च्या मध्ये उभा आहे. A हा F किंवा D च्या लगेच पुढे नाही. C हा D च्या लगेच पुढे नाही. F हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे ? (Combined Group B (Pre) - 2022)

11 / 52

Category: Seating Arrangement

11. पुढील माहिती काळजीपूर्वक अभ्यासून दिलेल्या माहितीशी विसंगत असलेला पर्याय निवडा.
A, B, C, D, E, Fव G सूर्यास्त पाहण्यासाठी ओळीत बसलेले आहेत पण ते दिलेल्या क्रमानेच असतील असे नाही. F व A यांच्या दरम्यान फक्त तीन व्यक्ति आहेत. F व A ओळीच्या अगदी टोकांना बसलेले नाहीत. Aव G यांच्या दरम्यान फक्त दोन व्यक्ति आहेत. E ही व्यक्ति A किंवा F ची लगतची शेजारी नाही. E ही व्यक्ति B च्या उजवीकडून तिसरी आहे. B ही व्यक्ति A ची लगतची शेजारी नाही. E ही व्यक्ति C ची लगतची शेजारी नाही.  (MPSC Clerk Mains - 2018)

12 / 52

Category: Seating Arrangement

12. काही मित्र कबड्डी पाहत आहेत. हाना 308 या आसनावर बसली आहे. हानाच्या उजव्या बाजूला 311 व्या आसनावर मंजू बसली आहे. हानाच्या डाव्या बाजूच्या आसनावर गगन बसला आहे. अब्बास गगनच्या डाव्या बाजूला बसला आहे. अब्बास व गगन यांच्या दरम्यानच्या तीन आसनांवर या सर्वांना अपरिचित असलेले लोक बसले आहेत. अब्बास बसलेल्या आसनाचा क्रमांक दिलेल्या पर्यायातून निवडा. (PSI Mains- 2020)

13 / 52

Category: Seating Arrangement

13. पुढे दिलेल्या अक्षरसाखळीचा उपयोग करुन F अक्षराच्या उजवीकडे लागून असलेल्या आणि C अक्षराच्या डावीकडे दुसऱ्या असलेल्या अक्षराच्या मधोमध असलेल्या अक्षराच्या उजवीकडून तिसऱ्या असणाऱ्या अक्षराच्या डावीकडे लागून असलेल्या अक्षराच्या उजवीकडून दुसरे असलेले अक्षर निवडा:
A B C D E F G H (AMVI - 2020)

14 / 52

Category: Seating Arrangement

14. समीर हा कबीर पेक्षा उंच आहे, कबीर हा अमीर पेक्षा उंच आहे, सुधीर हा शिशिर पेक्षा उंच आहे, शिशिर हा कबीर पेक्षा उंच आहे. तर सर्वांमध्ये ठेंगणा कोण ? (STI Mains - 2017)

15 / 52

Category: Seating Arrangement

15. विद्यार्थ्यांच्या रांगेत मोहन उजवीकडून 15 वा आणि दिनेश डावीकडून 18 वा आहे. जेव्हा ते दोघे आपसात जागा बदलतात, तेव्हा मोहन उजवीकडून 20 वा ठरतो. तर यावेळी दिनेशचे डावीकडून स्थान कोणते ?  (Forest Preliums - 2019)

16 / 52

Category: Seating Arrangement

16. ऐशा व तिच्या नवऱ्याने काल त्यांचे शेजारी असलेल्या भिन्न लिंगी जोडप्यांना इफ्तार मेजवानीचे निमंत्रण दिले होते. ते सर्वजण वर्तुळाकार बसले होते व मध्यभागी अन्न ठेवले. ऐशाने तुम्हाला पुढील तथ्ये सांगितली आहेत. 
i) डॅनी एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो अनुच्या डावीकडे बसला आहे.
ii) ईशा एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी एका पुरुषाच्या डावीकडे बसली आहे जो एका स्त्रीच्या डावीकडे बसला आहे जी माझ्या नवऱ्याच्या डावीकडे बसली आहे.
iii) दिनू एका स्त्रीच्या डाव्या बाजूला बसला आहे जी राजाच्या डावीकडे बसली आहे.
iv) मी माझ्या नवऱ्याच्या शेजारी बसलेली नाही. दिलेल्या पर्यायातून माझ्या नवऱ्याचे नाव निवडा. (STI Preliums - 2014) 

17 / 52

Category: Seating Arrangement

17. अकरा खेळाडू A, B, C, D, E, F, G, H, I, J आणि K त्यांच्या प्रशिक्षकासमोर एका रांगेत उभे आहेत.
a) D, जो F च्या डावीकडे लगत आहे. C च्या उजवीकडे दुसरा आहे.
b) A, E च्या उजवीकडे दुसरा आहे, की जो एका टोकाला आहे.
c) J, A आणि B चा लगतचा शेजारी आहे आणि G च्या डावीकडे तिसरा आहे.
d) H, D च्या डावीकडे लगत आहे आणि । च्या उजवीकडे तिसरा आहे.
तर रांगेच्या मध्यभागी कोण आहे ? (State Excise Preliums - 2017) 

18 / 52

Category: Seating Arrangement

18. माहिती अभ्यासा आणि तिच्या संदर्भात निश्चितपणे सत्य असणारे विधान निवडा.
C ही वसाहत F, D आणि G या वसाहतींच्या दक्षिणेला वसली आहे. C आणि A या वसाहती E च्या पूर्वेला वसलेल्या आहेत आणि B ही वसाहत C आणि A च्या पश्चिमेला वसलेली आहे. A आणि B या वसाहती C या वसाहतीच्या दक्षिणेला वसलेल्या आहेत. (CSAT - 2022)

19 / 52

Category: Seating Arrangement

19. संयुक्त कुटुंबातील चार भावंडांना मिठाई वाटून घ्यायची आहे. सर्वात धाकट्याला जास्त मिठाई द्यायचे त्यांनी ठरविले. स्वाती, गणेशपेक्षा दोन महिन्यांनी मोठी आहे, जो नीलापेक्षा तीन महिन्यांने नी लहान आहे. काशी, गणेशपेक्षा एक महिन्याने मोठी आहे. मिठाईचा जास्त वाटा कोणाला मिळेल ? (AMVI - 2020)

20 / 52

Category: Seating Arrangement

20. राम, श्याम, सुरेश, चंदू आणि कमला हे पाच मित्र एका रांगेत दक्षिणेकडे तोंड करुन क्रिकेट पाहत आहेत; अर्थात ते या नामक्रमाने बसलेले असतील असे नाही. केवळ श्याम हा राम आणि कमला यांच्यामध्ये, तर सुरेश हा कमलाच्या उजव्या बाजूला लगतच आहे आणि चंदू रामच्या डाव्या बाजूला लागूनच आहे. ह्या माहितीच्या आधारावर खालील कोणते विधान निश्चितपणे सत्य आहे ? (ASO Mains- 2021)

21 / 52

Category: Seating Arrangement

21. काली, ऑर्थर, हेमा, फातिमा आणि लेना पाच सुगाव्यांच्या मदतीने खजिना शोध घेत आहेत. कालीला सर्व सुगावे लागले पण तिने शोध सर्वात शेवटी संपवला. लेना दुसऱ्या क्रमांकाला परतली पण तिचे दोन सुगावे चुकले. लेनापेक्षा हेमाचे दोन जास्त प्रश्न बरोबर होते पण तिने लेनाच्या नंतर शोध संपवला. ऑर्थर लेनापेक्षा अधिक वेगाने नव्हता. फातिमा हेमापेक्षा अधिक वेगात होती आणि तिचा फक्त एकच प्रश्न चुकला.
 जर वरील माहिती सत्य असेल तर पुढीलपैकी सत्य असणे शक्य नाही असे फक्त एक विधान निवडा. (Tax Asst. Mains - 2018)

22 / 52

Category: Seating Arrangement

22. १) बंडू मन्यापेक्षा उंच उडी मारतो. 
२) विली बंडूपेक्षा उंच उडी मारतो. 
३) मन्या विलीपेक्षा उंच उडी मारतो. 
या तीन विधानांपैकी पहिली दोन विधाने सत्य असल्यास तिसऱ्या विधानाचे जास्तीत जास्त तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा.  (MPSC Clerk - 2015 ) 

23 / 52

Category: Seating Arrangement

23. प्रविण, अजय, राहूल, सोहम आणि तनिश यामध्ये प्रविण उंचीने दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि सोहम हा सर्वात ठेंगू व्यक्तीपेक्षा उंच आहे, दुसऱ्या क्रमांकावर आहे. ( उंचीने) जर त्यांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास मध्यभागी कोण असेल ?
अ) सर्वांना उंचीच्या क्रमाने उभे केल्यास अजय हा तीन क्रमाकांने सोहमच्या वर आहे.
ब) राहूल हा सोहमपेक्षा उंच आहे परंतु प्रविणपेक्षा बुटका आहे.
क) तनिश सर्वात बुटका नाही.
प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी माहिती पुरेशी आहे ते सांगणारा पर्याय निवडा. (STI Mains  - 2018) 

24 / 52

Category: Seating Arrangement

24. एका वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मानसी वरुन 11 व्या क्रमांकावर व शेवटून 31 व्या क्रमांकावर आहे. जर परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या 8 असेल तर परीक्षेला किती विद्यार्थी बसले होते ?  (PSI Mains - 2016)

25 / 52

Category: Seating Arrangement

25. खालील विधाने तपासून पाहा :
अ) एक तर रमेश व किरण एकाच वयाचे आहेत किंवा रमेश किरणपेक्षा वयाने मोठा आहे.
ब) एक तर सौरभ व संग्राम एकाच वयाचे आहेत किंवा संग्राम सौरभपेक्षा वयाने मोठा आहे.
क) सौरभपेक्षा किरण वयाने मोठा आहे.
वरील विधानांतून खालीलपैकी कोणता निष्कर्ष काढता येतो ? (PSI Preliums - 2014)

26 / 52

Category: Seating Arrangement

26. A, B, C, D, E, F, G आणि H असे आठ मित्र वर्तुळाकार बसलेले आहेत. सर्वांची तोंडे वर्तुळ मध्याकडे आहेत. A, B च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी व F च्या उजव्या बाजूला दुसऱ्या स्थानी बसलेला आहे. D हा A किंवा B च्या बाजूला बसत नाही. C व G नेहमी एकमेकांजवळ बसतात. H हा D च्या बाजूला बसत नाही. C हा B च्या बाजूला बसत नाही. पत्ते खेळण्यासाठी त्यांनी चार जणांचा एक, असे दोन गट तयार केले. प्रत्येक गटात, एक सोडून एक असे सदस्य घेण्यात आलेत. खालीलपैकी कोणता समूह, अशा प्रकारे तयार झालेला गट असू शकणार नाही ?  (STI Mains - 2015)

27 / 52

Category: Seating Arrangement

27. लिलीकडे रया आणि डेव्ह यांच्या एकूण पुस्तकांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. रया आणि कार्ल या दोघांकडे असलेल्या एकूण पुस्तकांपेक्षा लिलीकडे कमी पुस्तके आहेत. सोनाकडे कार्लपेक्षा अधिक पुस्तके आहेत. परीकडे लिलीपेक्षा जास्त पुस्तके आहेत. वरील माहितीच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा.  (MPSC Clerk Mains - 2018 )

28 / 52

Category: Seating Arrangement

28. A, B, C, D, E आणि F या सहा व्यक्ती एका ओळीत उत्तरेकडे तोंड करुन बसल्या आहेत. E च्या डावीकडे तिसऱ्या स्थानी C बसला आहे. A आणि C यांच्या दरम्यान एक व्यक्ती बसली आहे. B आणि D यांच्या दरम्यान दोन व्यक्ती बसल्या आहेत. B हा A चा शेजारी आहे. F हा D चा शेजारी नाही. F च्या उजवीकडे दुसऱ्या स्थानी कोण बसले आहे. (Mhada -2022)

29 / 52

Category: Seating Arrangement

29. चार विद्यार्थ्यांची उंची W, X, Y, Z अशी आहे आणि
2X = W + Z, 2W = X + Y, 2Y = W त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल ? (STI Preliums - 2013)

30 / 52

Category: Seating Arrangement

30. जयचे मांजर अॅमीच्या मांजरापेक्षा मोठे आहे, परंतु ते जैनीच्या मांजरापेक्षा आकाराने लहान आहे. फिजाचे मांजर आकाराने वेणूच्या मांजराएवढेच आहे, जे अॅमीच्या मांजरापेक्षा मोठे असून जयच्या मांजरापेक्षा लहान आहे. जर आकाराने मोठी मांजरे वेगवान असतील आणि आकाराने लहान मांजरे आज्ञाधारक असतील तर पुढील यादीतून सर्वात वेगवान आणि सर्वात आज्ञाधारक मांजरमालकाची जोडी निवडा.  (CSAT - 2019)

31 / 52

Category: Seating Arrangement

31. एका रांगेत अनुजाच्या डाव्या बाजुला चौथ्या क्रमांकावर असलेल्या सीमाचा उजवीकडून दहावा व डावीकडून चौदावा क्रमांक आहे तर अनुजाचा रांगेतील क्रमांक कोणता ? (MPSC Clerk - 2013)

32 / 52

Category: Seating Arrangement

32. सना, दीपा, अनिता, सविता, अलिया, कविता, सुनिता आणि वनिता वर्तुळाकार टेबलाभोवती खेळ खेळतात.
(a) अनिता आणि अलिया यांची तोंडे परस्परांसमोर आहेत. 
(b) सना आणि दीपा या अनिता आणि अलियाच्या शेजारी नाहीत.
(c) वनिता ही सनाच्या उजवीकडे आहे आणि अनिताच्या शेजारी आहे.
(d) कविता ही अलियाच्या शेजारी नाही आणि सविता ही दीपाच्या शेजारी नाही. 
जर सविता आणि दीपा यांनी जागेची अदलाबदल केल्यास पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे ठरेल. (PSI मुख्य 2019)

33 / 52

Category: Seating Arrangement

33. सात व्यक्तींतून चार जणांचा गट तयार करायचा आहे. या व्यक्तीचा तपशील पुढीलप्रमाणे, यात M व N या स्त्रिया व A, B, C, D व E हे पाच पुरुष आहेत. जर व्यक्ती B सुध्दा निवडली गेली, तर A ला गटात असणे आवडणार नाही. B व E दोघांना एकत्र गटात निवड झालेली आवडेल. जर D गटात असेल, तरच N ला त्यात असणे आवडेल. जर C ची निवड झाली, तर तिला D गटात असणे आवडणार नाही. जर गटात D सुध्दा असेल, तर A ला गटात असणे आवडेल. जर गटात तो असेल, तर त्यात M ची निवड व्हायला हवी असा C चा आग्रह आहे. दिलेल्या पर्यायांतील सर्वात समाधानी गट निवडा.  (State Excise Mains - 2017) 

34 / 52

Category: Seating Arrangement

34. एका स्पर्धेत जयाच्या वर्गातील सहा विद्यार्थ्यांनी भाग घेतला नाही. पाच विद्यार्थी पहिल्या फेरीत बाद झाले. जयाचा क्रम सर्वात उच्च स्थानी असलेल्या स्पर्धकात सोळावा आहे, तर शेवटी असणाऱ्या स्पर्धकात एकोणतीसावा आहे. जयाच्या वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.   (MPSC Clerk Mains - 2017)

35 / 52

Category: Seating Arrangement

35. खालील माहिती वरुन प्रश्नाचे उत्तर द्या :
अ) प्रत्येक रेडिओ स्टेशनची फ्रिक्वेन्सी कमीत कमी 10 सायकलने जास्त किंवा कमी आहे.
ब) स्टेशन A हे B पेक्षा 10 सायकलने कमी आहे 
क) स्टेशन B हे C पेक्षा 20 सायकलने कमी आहे 
ड) स्टेशन D हे E पेक्षा 50 सायकलने जास्त आहे 
इ) स्टेशन E हे F पेक्षा 10 सायकलने जास्त आहे 
फ) स्टेशन F हे B पेक्षा 30 सायकलने कमी आहे
C व E स्टेशनच्या मध्ये कोणती स्टेशन कार्य करतात ? (Forest Preliums - 2017)

36 / 52

Category: Seating Arrangement

36. खालील प्रश्न दिलेल्या माहितीवर आधारित आहे.
1) दक्षिणेकडे तोंड असलेल्या पाच व्यक्ती A, B, C, D आणि E, आणि उत्तरेकडे तोंड करुन बसलेल्या पाच व्यक्ती M, N, O, P आणि Q परस्परांसमोर दोन समांतर रांगांमध्ये बसल्या आहेत.
II) E हा O च्या समोर आहे, जो M च्या उजवीकडे लागून आहे.
III) C आणि N एकमेकांच्या समोर कर्णरेषेत आहेत. 
IV) B, जो D च्या डावीकडे लागून आहे, Q च्या समोर आहे. 
V) M हा रांगेच्या एका टोकाला आहे.
VI) P, जो Q च्या डावीकडे लागून आहे, D च्या समोर आहे. जर B हा E च्या जागेवर गेला, E हा Q च्या जागेवर गेला आणि Q हा B च्या जागेवर गेला, तर O च्या समोरील व्यक्तीच्या डावीकडून दुसरी व्यक्ती कोण असेल ? (Combined Group B (Pre) - 2020)

37 / 52

Category: Seating Arrangement

37. सहा जणांच्या रांगेत D आणि C हे E चे लगतचे शेजारी आहेत. B हा फक्त A चा शेजारी आहे. A हा F पासून चौथा आहे. तर दोन टोकांना कोण आहेत ? (PSI मुख्य- 2014)

38 / 52

Category: Seating Arrangement

38. गोपाळच्या पुढे 3 मुले सोडून त्या रांगेत 8 मुले उभी आहेत आणि गोपाळच्या मागे 5 मुले सोडून त्याच रांगेत 12 मुले उभी आहेत, तर त्या रांगेत एकूण मुले किती आहेत ? (Tax Asst. Pre - 2017) 

39 / 52

Category: Seating Arrangement

39. काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत. V ही व्यक्ती An च्या शेजारी आणि S ही व्यक्ती G च्या शेजारी आहे. G ही व्यक्ती Aj च्या बरोबर नाही. Aj बाकाच्या डाव्या टोकाला आणि S बाकाच्या उजव्या टोकाकडून दुसऱ्या स्थानी आहे. V ही व्यक्ती An च्या उजवीकडे आणि Aj च्या उजवीकडे आहे. V आणि S सोबतीने बसल्या आहेत. जर G आणि V यांनी त्यांच्या जागांची अदलाबदल केली तर या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानांपैकी सत्य नसलेले विधान निवडा.  (Combined Group B (Pre) - 2022) 

40 / 52

Category: Seating Arrangement

40. परमितने बियांचे रोझपेक्षा जास्त नमुने गोळा केले. रोझने नीलपेक्षा कमी नमुने गोळा केले. नीलने परमितपेक्षा जास्त नमुने गोळा केले. ऋताने परमितपेक्षा जास्त परंतु नीलापेक्षा कमी नमुने गोळा केले. सर्वात जास्त नमुने कोणी गोळा केले ?  (PSI Mains - 2019)

41 / 52

Category: Seating Arrangement

41. माझ्यासमोर विविध रंगाच्या सात खुर्च्या मांडल्या आहेत. पिवळ्या रंगाची खुर्ची निळ्या व जांभळ्या खुर्च्याच्या मध्ये आहे. हिरव्या रंगाची खुर्ची लाल व नारिंगी खुर्च्याच्या मध्ये आहे. पांढऱ्या रंगाची खुर्ची निळ्या खुर्चीच्या बाजूला आहे परंतु ती लाल किंवा जांभळ्या खुर्च्याच्या बाजूला नाही. ही माहिती सत्य मानून पुढीलपैकी निष्कर्षाचे/निष्कर्षांचे सर्वात उचित वर्णन निवडा.
(a) निळी खुर्ची नेहमीच पांढऱ्या खुर्चीच्या बाजूला असणार. 
(b) पांढऱ्या खुर्चीच्या बाजूला नारिंगी खुर्ची असणे शक्य आहे.
(c) जांभळ्या खुर्चीच्या बाजूला एकतर लाल किंवा नारिंगी खुर्ची असणे शक्य आहे.  (ASO Mains - 2018) 

42 / 52

Category: Seating Arrangement

42. जेव्हा लैला, लीला, ललिता व लीना वयानुसार उभ्या राहातात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली उभी राहाते तर लीला शेवट पूरा करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहातात, ललिता सर्वांत ठेंगू असल्याने पहिली उभी राहाते तर लीला तिसऱ्या जागी येते. दोन्ही रांगांत लीना दुसऱ्या जागीच येते. लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा. (STI Mains - 2015)

43 / 52

Category: Seating Arrangement

43. दिलेली माहिती वाचून त्यासंदर्भातील चुकीचे विधान निवडा.
A, B, C, D, E, F, G व H ही चित्रे समान अंतरावर वर्तुळाकार सभागाराच्या भिंतीवर प्रदर्शित केली आहेत. B हे G आणि D च्या दरम्यान आहे. H हे B च्या डावीकडे तिसरे आणि A च्या उजवीकडे दुसरे आहे. C हे A आणि G च्या दरम्यान प्रदर्शित केले असून B व E व्यासाच्या परस्परविरुद्ध नाहीत. (PSI Mains - 2016)

44 / 52

Category: Seating Arrangement

44. A, B, C, D, E आणि F ही मुले परस्परांकडून तोंडे करुन कानदुखीचा खेळ खेळण्यासाठी वर्तुळाकार बसलेली आहेत. आणि ती येथे दिलेल्या क्रमाने असतीलच असे नाही. A हे मुल F च्या समोर आणि C च्या डावीकडे बसले आहे E हे मुल D किंवा B च्या शेजारी नाहीत. B हे मुले A च्या शेजारी नाहीत. जर B हे मुल स्वतःच्या डावीकडील मुलाच्या कानात सर्वप्रथम कुजबुजणारं असेल तर पहिल्या फेरीच्या शेवटी कानात संदेश बोलण्याची संधी न मिळणारे मुल निवडा. (CSAT - 2022)

45 / 52

Category: Seating Arrangement

45. प्रियाचे प्राप्तांक नेहा पेक्षा जास्त आहेत. हर्षचे प्राप्तांक राकेश एवढे आहेत. राहुलचे प्राप्तांक दिव्या पेक्षा कमी आहेत. नेहाचे प्राप्तांक हर्ष पेक्षा जास्त आहेत. दिव्याचे प्राप्तांक राकेश पेक्षा कमी आहेत. सर्वात कमी कोणाचे प्राप्तांक आहेत ?  (Forest Preliums - 2018)

46 / 52

Category: Seating Arrangement

46. केट ही युगपेक्षा वयाने तीनपट मोठी आहे. मिनी ही वयाने झरिनच्या निम्मे आहे. युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. सत्य अनुमानाची निवड करा.  (Tax Asst. - 2016) 

47 / 52

Category: Seating Arrangement

47. फोटो काढण्यासाठी 5 मुली एका बाकावर बसलेल्या आहेत.
लताच्या लगेचच डावीकडे सविता बसलेली आहे. कविताच्या लगेचच डावीकडे अमृता बसलेली आहे. अमृताच्या लगेचच डावीकडे भाविका बसलेली आहे तर मध्यभागी कोण बसलेले आहे ?  (Tax Asst. Mains - 2019) 

48 / 52

Category: Seating Arrangement

48. पुढील माहिती वाचून विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर निवडा. पाच मित्र संगणक प्रयोगशाळेत अर्धवर्तुळाकार टेबलावर बसलेले आहेत. ते पुढीलप्रमाणे बसलेले आहेत.
अ) 'C' च्या लगत उजवीकडे 'D' बसलेला आहे. 
ब) 'D' आणि 'E' च्या दरम्यान 'A' बसलेला आहे.
क) 'E' च्या लगत डावीकडे 'B' बसलेला आहे. 
तर मधोमध कोण बसलेला आहे?  (State Excise Mains - 2019)

49 / 52

Category: Seating Arrangement

49. आठ मित्र क्रिकेटचा सामना पाहात पुढीलप्रमाणे बसले आहेत. अशोकच्या उजव्या बाजूला भरत असून, त्याच्या उजवीकडे कोणीही नाही. इंद्रदेव व गणेश यांच्यामध्ये आदित आहे. हुसेनच्या उजव्या बाजूला गणेश आहे. भरत व धनराज यांच्यामध्ये अशोक आहे. इंद्रदेव हा धनराजच्या शेजारी आहे. अंजली कोणत्या तरी एका कडेला आहे तर अशोक व गणेश यांच्यामध्ये किती व्यक्ती आहेत ? (STI Mains - 2019)

50 / 52

Category: Seating Arrangement

50. A, B, C, D, E, F आणि G हे सर्वजण एका गोलाकार टेबलभोवती बसले आहेत.
अ) F हा G च्या उजव्या बाजूला दुसरा आहे.
ब) B हा F च्या शेजारी पण, G च्या शेजारी नाही.
क) E हा C च्या शेजारी व G च्या उजव्या बाजूस चौथा.
ड) D हा E आणि A यांच्या मध्ये बसलेला आहे. 
तर G च्या डाव्या बाजूस चौथ्या स्थानी कोण बसलेला असेल ?  (MPSC Clerk - 2015)

51 / 52

Category: Seating Arrangement

51. A, B, C, D, E, Fहे सहा मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहेत. E हा D च्या डाव्या बाजूस आहे. C हा A आणि B च्या मध्ये आहे. F हा E आणि A च्या मध्ये आहे. तर B च्या डाव्या बाजूला कोण आहे ? (PSI Preliums - 2014)

52 / 52

Category: Seating Arrangement

52. सहा वाहने एका ओळीत उभी केली आहे. उजव्या टोकाला असलेले वाहन निवडा.
1) उजव्या टोकाला असलेले वाहन डम्पर नाही.
2) मोटर बाइक व डम्पर एकमेकांच्या शेजारी नाहीत.
3) छोटी व्हॅन व गाडी एकमेकांच्या शेजारी आहेत. 
4) लॉरी डाव्या बाजूचे 1 ले वाहन आहे...
5) टेम्पो हे उजवीकडून 2 रे वाहन आहे. (STI Mains - 2018)

Loading...MPSC is all about Patience....

Scroll to Top